औरंगाबाद- आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना सोडून स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला आहे. नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असणारे हर्षवर्धन जाधव यांनी मागील काही दिवसांपासून विविध वृत्तमानपत्रातून जाहिरातीच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. रविवारी त्यांनी औरंगाबाद शहरातील सर्वच उर्दू भाषेतील वृत्तमानपत्रातून जाहिरातीच्या माध्यमातून खासदार चंद्रकांत खैरेंना निशाणा करत ते आतंकवादी मानसिकतेचे असून त्यांनी हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचे काम केले आहे. या आतंकवाद्याला कायमचा गाडून टाका असे आवाहन केले आहे.
आमदार
हर्षवर्धन जाधव लोकसभेच्या जोरदार तयारीला लागले असून त्यांनी रविवारी औरंगाबाद येथील सर्वच उर्दू भाषेतील वृत्तमानपत्रातून
एका जाहिरातीद्वारे भप,शिवसेना, एमआयएम, ह्या जातीयवादी टोळ्या आहेत, त्यांना वेळीच थांबवले पाहिजे. शहरातील धार्मिक सलोखा उध्वस्त
करण्याचे काम खासदार खैरे यांनी केले असून त्यांची मानसिकता आतंकवादी प्रकारातील
असून या आतंकवाद्याला जमिनीत गाडून टाकण्याचे काम हिंदू आणि मुस्लिम मतदारांना
करावे लागणार आहे . जाधव म्हणतात की, आपण सर्व एक आहोत आपण धर्म भेद विसरून एकत्र येऊ मला लोकसभेत
जाण्यासाठी मुस्लिमांनी मतदान करावे असे आवाहन या जाहिरातीतून आमदार जाधव यांनी
मुस्लिम समाजाला केले आहे.
काय आहे
जाहिरात
जाधव म्हणतात
की खैरेंनी धर्माचा आधार घेतला, वोळोवेळी हिंदू
मुस्लिमांना आपसात भांडण करायला लावले याचा परिणाम म्हणून ते खासदार झाले. ते म्हणतात कि मी फक्त हिंदूंचा खासदार आहे
मुस्लिमांचा नाही. असल्या सैतानी मानसिकतेच्या माणसाला पुनः ताकाचा हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र यावं लागेल.
आपल्याकडे याशिवाय कुठलाही पर्याय नाही. खैरेंच्या बाबतीत हिंदू लोक सुद्धा
असंतुष्ट असून ते सुद्धा त्यांना मतदान करू इच्छित नाहीत. जर आपण आता एकत्र नाही आलो तर हे शैतान
सैतान पुन्हा जागे होईल. त्यामुळे मी औरंगाबादच्या नागरिकांना आवाहन करतो की या
दहशतवाद्याला कायमच गाडून टाका.

















